श्री.संतशिरोमणी नामदेव महाराज.
(इ.स.१२७० ते इ.स.१३५०) नरसीबामणी (कऱ्हाड).
इ. स. ११९३ साली पृथ्वीराजाचा चव्हाण वध होऊन उत्तर हिंदुस्तानांत मुसलमानांचा अंमल कायम झाला व हिंदुधर्मीयांस वाईट दिवस प्राप्त झाले.
परंतु इ. स. १२९४ पर्यंत त्यांना दक्षिण हिंदुस्थानांत प्रवेशा करीतां आला नाहीं. दक्षिणेस देवगिरी येथें यादवकुलोत्पन्न रामदोवराव राज्य करीत असतां इ. स. १२९४ साली. अल्लाउद्दिन खिलजीनें देवगिरीवर स्वारी करुन रामदेवरावांचा परभव केला व अल्लाउद्दिनाचा तिसरा मुलगा मुबारिक यानें इ. स. १३१८ त. दक्षिण प्रांती आपला पूर्ण अम्मल बसविला.
दक्षिण हिंदुस्थानकडे मुसलमानांचा डोळा गेला आहे अशा सुमारास हिंदुधर्मावर पुढें येणाऱ्या संकटास तोंड देण्यास. हिंदुधर्मीयांस समर्थ करण्याकरीतां इ. स. १२७१ सालीं श्रीविष्णुरुपानें श्रीज्ञानदेव प्रगट झाले. त्याचे आधीं इ. स. १२६८ सालीं श्रीशंकराचे अंश श्रीनिवृत्तीनाथ जन्मास आले. निवृत्ति, नामदेव, सोपान व मुक्ताबाई अशी ही चोकडी व नामदेवमहाराज असे एक दोन वर्षाच्या अंतरानें श्रीविठ्ठलाच्या झेंड्याखलीं भागवधर्माचा प्रसार करुन हिंदुधर्माचें संरक्षण कर्ण्याकरितां महाराष्ट्राच्या पुण्यभूमींत संचार करुं लागले.
आबालवृद्ध -स्त्रीपुरुष,-'ज्ञानी'-अज्ञानी, स्पृश्य-अस्पृश्य, स्वधर्मी, विधर्मी, यांना आपल्या पंखाखाली घेऊन, सर्वांना हिंदुधर्माच्या कक्षेंत ठेवणाऱ्या व भक्ति ज्ञान वैरग्य, या त्रयीवर अधिष्ठित असलेल्या भागवतधर्माच्या तत्वांचा या पांच अवतारी पुरुषांमध्ये महान् विठ्ठालभक्त नामदेव महाराज यांचा समावेश होतो. भवसागर तरुन जाण्याकरितां अत्यंत सोपें साधन व आबालवृद्धांनाहि अनुसरतां येण्यासार्खें श्रीविठ्ठल नामरुपी साधन श्रीनामदेवमहाराजांनी सर्वांना दाखवून दिलें. किंबहुना विठ्ठलनामाचें मह्त्त्व पट्वून देण्याकरितांच नामदेवांचा अवतार होता असें म्हणतां येईल.
एक माझ्या पांडुरंगाला चित्तांत नेहमी आठवा म्हणजे तुमचा उद्धार होईल, हें श्रीनामदेवमहारजांनीं स्वोदाहर्णानें अखिल जनांस पट्वून दिंले. सबगोलंकारी मुसलमानी धर्माच्या मोहक स्वरुपास फसून हिंदुधर्मीय विचलित होण्याचा संभव आहे. हें जाणूनच या नामरुपी धर्माची ढाल हिंदुधर्मीयांचे संरक्षण करण्याकरितां पुढें करुन, हिंदुधर्मास संघटित करुन नामदेवांनी अवघ्या २६ वर्षात आपलें अवतारकार्य संपविलें.
अशा या भागवतधर्म वीराचा जन्म दामशेटांची स्त्री गोणाबाई इचे पोटीं ९ महिने पूर्ण होतांच शके ११९२ प्रभव नाम संवत्सरे कार्तिक शुल्क ११ रविवार रोजीं झाला.
हा सनत्कुमाराचाच अवतार झाला असें समजून देवांनी पुष्पवृष्टी केली.
ईश्वरनिष्ठ आणि भगवद्भक्त असें थोर कुळ पाहुनच थोर महात्मे त्या कुळांत जन्म घेतात. श्रीनामदेवमहाराजांचा मूळ पुरुष यदुशेट नांवाचा कोणी एक शिंपी असून त्याचें उपनांव रेळेकर असें होतें.
श्रीक्षेत्र कऱ्हाड्नजीक कृष्णातीरीं नरसीबामणी म्हणून एक खेडेगांव आहो, तेथें कापड विकण्याचा धंदा करुन राहात असें. हा महाविठ्ठलभक्त असून नेहमीं विठ्ठलाचें नामस्मर्ण करीत असें. नामदेवांचे वडील दामशेठ यांच्यापर्यंत मध्यंतरीं जे पुरुष तेहीं सर्व विठ्ठलभक्त असून पंढरीची वारी नेमानें करीत. ज्यांनी हा नेम टाळला, त्यांना लगेच कोणा तरी आप्तेष्टांच्या मृत्यूनें प्रायश्चित्त मिळे; निदान त्यांची तशी समजुत होऊन विठ्ठलभक्तींत अंतर पडूं न देण्याबद्दल काळ्जी घेतली जाई.
श्रीनामदेवांचे वडील दामशेठ हे त्यांचे वडील व मातुश्री लहानपणींच वारल्यामुळे फार दु:खी-कष्टी होऊन आपल्या मामाकडे कांही दिवस राहावयांस गेले. दामशेटाची हुषारी व भगवन्निष्ठा पाहून कल्याणचे गोविंदशेठ सोदागरकर यांनी आपली गोणाबाई नांवाची मुलगी यथाविधि दामशेटांस अर्पण केली. गोणाबाईस प्रथम आऊबाई नांवाचें कन्यारत्न झालें. हें पाहून गोणाबाईच्या मनास फार वाईट वाटलें. तिच्या मनांत आपल्याला प्रथम मुलगा व्हावा असें होतें, तिने आपल्यास पुत्र व्हावा म्हणून वरचेवर नवस करण्यास सुरवात केली, व पांडुरंगाची यथासांग नित्य सेवा करतां यावी म्हणून ती दामशेटासह पंढरपुरास येऊन राहीली, व पांडुरंगाचे कृपेने गोणाबाईस पुत्ररत्न झालें. मोठ्या थाटाचें बारसें होऊन मुलांचें नांव नामदेव असें ठेविलें.
नामदेव दोन वर्षाचा होऊन बोलुं लागला. हा नामाचा अवतार विठ्ठलनामाशिवाय दुसरें काय बोलणांर ? गर्भात असतांच विठ्ठलनामाचा जप चालूं असल्यामुळें त्याच्या मातेलाहि विठ्ठलनामाचेच डोहाळे होत होते.
मुलगा पांच वर्षाचा होतांच दामशेटानें त्यास तेव्हांच्या रुढीप्रमाणें शाळेत घातलें. पण या स्वारीला विठ्ठलनामाशिवाय दुसरें तिसरें कांहीं सुचले तर पंतोजीच्या ओनामाकडे याचें लक्ष जाणार ? पंतोजी जरा कोठें बाहेर गेले कीं हा आपल्या सवंगड्यास विठ्ठलनामाचें स्मरण करा, विठ्ठलनाम वाचा, विठ्ठलनाम लिहा असें सांगें. विठ्ठलनामावर व विठ्ठलाचे चरणीं या अल्पवयांत त्याची निस्सीम श्रद्धा होती.
सात वर्षाचा होऊन तो हिंडूं फिरुं लागतांच दगडाचे टाळ बनवून सवंगड्याचे मेळे जमवून तो विठ्ठलनामाचा गजर करी व तो विठ्ठलनामांतच दंग होऊन जाई. कर कटीवर ठेवून विटेवरी उभा असलेला पांडुरंग आपल्या बरोबर भजन करील अशी त्याची दृढ श्रद्धा. हा दगडाचा अचेतन विठ्ठल आपल्याशीं बोलूं शकणार नाहीं हि कल्पनाहि त्याचे मनाला शिवली नाहीं. त्याला भजनाचा विलक्षण छंद लागला होता, व भजनाचा हा सुखसोहळा श्रीपांडुरंगाने आपल्या बरोबर अनुभवावा असें त्यास वाटून तो देवाजवळ धरणें घेऊन बसें. बालनामदेवाची आपले चरणीं असलेली अचल निष्ठा पाहून श्रीपांडुरंगहि त्याचेबरोबर नाचण्यास अनमान करीत नसे.
नामदेव हरि हरि असें भजन करीत असतां श्रीपांडुरंग हरि हरि न म्हणतां हरहर असें म्हणत असल्यांचे नामदेवांचे ध्यानीं येतांच देवांनींसुद्धा हरि हरि असें म्हणावे म्हणुन नामदेव हट्ट घेऊन बसला व शेवटीं हाहि हट्ट श्रीपांडुरंगाने पुरविला. दिवसेंदिवस नामदेवांची सांगावें आणि देवांनी ऎकावें असें होऊ लागलें. श्रीपांडुरंग नामदेवांच्या भक्तीला इतके भाळुन गेले की, त्यांनी नामदेवांच्या सांगीवरुन नामदेवांनीं आणलेला नैवेद्यहि खाऊन टाकला. जी जी गोष्ट आपण करतों ती ती आपल्या देवांनी करावी असें नामदेवास वाटे.
एकदां नामदेवांनी चुलीवरचें कढत दूध नेऊन देवास पिण्यास दिलें. पण देव तें कढत असल्यामुळें पिईनात. तेव्हा नामदेवांनीं त्रागा करुन, जीव देण्याचा निश्चय केला, व देवांनी तें तसें कढत दुध प्राशन केलें. घरातील सर्व दुध खलास झाल्यामुळें नामदेवांस गोणाबाईनें जाब विचारता श्रीविठ्ठलाला तें मी नेऊन पाजलें असें त्यानें सांगितले. तूं खोटें बोलतोस असें म्हणतांच चला देवाकडे, मी कधीहि खोटे बोलत नाहिं असें त्यांनी सांइग्तले. प्रचिती पाह्तां सत्य उघड्कीस येऊन श्रीविठ्ठल नामदेवाशीं बोलतात, त्याचा नैवद्य भक्षण करतात असा चोहोंकडे बोमाटा झाला. प्रत्यक्ष देव नामदेवांशी सर्व प्रकारचे व्यवहार कर्तात अशी नामदेवांची कीर्ति ऎकुन गोविंदशेट सदावतें यांनी आपली राजसबाई नांवाची मुलगी नामदेवास देऊं केली, व दामशेटानें नामदेवाचें लग्न त्याच्या आठव्या वर्षी मोठ्या थाटाने करुन दिलें.
त्याची गणना संतमंडळीत होऊं लागली. त्याचीं भक्तिरसानें ओथंबलेली कीर्तनें ऎकण्यास लोकांची गर्दी जमूं लागली.
ज्ञानेश्वरादिक संतमंडळीहि तीं ऎकून माना डोलवीत. प्रत्यक्ष श्रीपांडुरंग नामदेवानें आपल्या श्रद्धेचा व भक्तिबलाच्या जोरावर वश करुन घेतला होता पण नामदेवाने गुरुपदेश घेतला नसल्यामुळे ज्ञानेश्वरादि मंडळी त्यास ब्रह्मज्ञान समजण्यास अपात्र ठरवीत. नामदेवा, तूं गुरुपदेश घेतल्याशिवाय तुला पूर्ण ज्ञान होणार नाहीं; असें ज्ञानेश्वर त्याला नेहमी सांगत, पण त्यावर श्रीज्ञानेश्वरांचें बोलणें न पटून तो म्हणे कीं, प्रत्यक्ष परमेश्वर मला लाभल्यावर आतां दुसऱ्या गुरुची काय मातबरी आहे ! तेव्हां एके दिवशी सर्व संतमंडळी एकत्र ब्रह्मज्ञान विषयक चर्चा करीत बसली असतां श्रीज्ञानेश्वरांनी गोरोबा कुंभाराकडून जमलेल्या लोकांत खरे ब्रह्मज्ञानी कोण आहेत त्याची परीक्षा करविलि व त्या परीक्षेत नामदेव एकटेच कच्चे ठरले.
तें पाहून त्यांनी मी कच्चा कसा म्हणून प्रश्न करतांच गोरोबांनीं, 'तुला गुरु ज्ञान नाहीं म्हणून तूं कच्चा' असें उत्तर दिलें. नामदेवांनी ही सारी श्रीविठ्ठलाचरणीं निवेदन केली व मी तुला ओळखत असतांना मला कच्चा कां म्हणतात तें सांग असा हट्ट धरला. 'तूं मला फक्त याच स्वरुपांत ओळखतोस. माझ्या अनंत रुपाची ओळख तुला गुरुपदेशावांचून पटणार नाहीं, तेव्हा तूं गुरुपदेश घें' असें विठ्ठलांनी त्याला सांगितलें. परंतू त्याला तें पटेना. मी तुम्हांस वाटेल त्या स्वरुपात ओळखेन असें त्यानें उत्तर दिल्यावर देवांनी दोन तीन निरनिराळीं रुपें घेऊन नामदेवास तीं ओळखतां येत नाहींत असें त्याच्या प्रत्ययास आणुन दिलें व गुरु कर असा त्यास उपदेश केला.
नंतर नामदेवांनीं देवांच्या सांगण्यावरुन विठोबा खेचरास आपला गुरु केला. नामदेवास गुरुपदेश होतांच त्याची पहिली दृष्टी साफ निवळली. गुरुपदेशाचा इष्ट परिणाम झाला आहे कीं नाहीं हें पाण्याकरिता एकदां नामदेव वसुली करण्याकरितां गांवास गेला असतां वाटेंत रोटी खात बसला होता; तेव्हां श्वानरुपानें येऊन त्याची एक रोटी देवांनी पळविलि. परंतु नामदेवांनीं या वेळी देवास बरोबर ओळखून त्या रोटीवर तुपाची वाटी ओतली. मग देव व नामदेव एकत्र जेवले. अशा प्रकारें गुरुपदेशानंतर नामदेव पूर्ण ज्ञानी झाले.