![]() |
Sant Bahinabaice Abhang 29 |
संत बहिणाबाईचे अभंग
गुरुपरंपरा आम्हां चैतन्य बळी । तयाचें स्मरणें आम्ही वैकुंठीं बळी ॥ १ ॥
नमस्कार हा तया साष्टांग माझा । वोवाळूं जीवें साधु चैतन्य राजा ॥ २ ॥
चैतन्य सर्वगत व्यापक सद्गुरु । प्रगटला हा 'तुकाराम' वेषें दातारु ॥ ३ ॥
तयाचें हें ध्यान सदा माझिये अंतरीं । अंतरीचें ध्यान 'तुका' सबाह्याभ्यंतरीं ॥ ४ ॥
नेणे स्नान दान जप आसन मुद्रा । सदा सर्व काळ ध्याऊं चैतन्यपदां ॥ ५ ॥
बहिणी म्हणे मुक्त आम्ही सद्गुरूचे ध्यानें । प्रेमें भक्तिभावें तया वोवाळूं प्राणें ॥ ६ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 28 |
संत बहिणाबाईचे अभंग
वाटे उठों नये जीव जाय तरी । सुख तें अंतरी हेलावलें ॥ १ ॥
आनंदे निर्भर होउनीया मन । करूं आलें स्नान इंद्रायणी ॥ २ ॥
घेतलें दर्शन पांडुरंगमूर्ती । तंव झाली स्फूर्ति वदावया ॥ ३ ॥
तुकोबासी तेथें करुनी नमस्कार । आलें मी सत्वर बिर्हाडासी ॥ ४ ॥
बहिणी म्हणे जैसा लोटला समुद्र । ह्रदयाकाशीं इंद्र बोले वाचा ॥ ५ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 22 |
संत बहिणाबाईचे अभंग
तुटकें संचित जालें शुद्ध चित्त । अंतरींचा हेत ओळखिला ॥ १ ॥
कृपा केली देवें इंद्रायणीतीरीं । देहुग्रामीं थोर भक्तिपंथ ॥ २ ॥
तेथें पांडुरंग देवाचें देऊळ । राहावया स्थळ प्राप्त झालें ॥ ३ ॥
तुकाराम संत संताचें कीर्तन । तिन्ही काळ तीन दृष्टीपुढें ॥ ४ ॥
नमस्कार तया न घडे पतिभयें । परि चित्त राहे सदा पायीं ॥ ५ ॥
बहिणी म्हणे ऐसे मास झाले सात । अवघेंची संचीत सरो आलें ॥ ६ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 21 |
संत बहिणाबाईचे अभंग
रामेश्वरभट्टें ऐकिला वृत्तान्त । धांवोनी त्वरीत तेथ आला ॥ १ ॥
तुकोबाचें तींहीं घेतलें दर्शन । गाय तेही पूर्ण पाहियेली ॥ २ ॥
दोहीचे पाठीचा दिसे एक भाव । रुदनीं ते सर्व प्रवर्तले ॥ ३ ॥
तुकोबाचे पार वर्णिलासा कोण । कलियुगीं जाण प्रल्हाद हा ॥ ४ ॥
सर्वांतर साक्षी करोनीया स्तुती । स्वमुखें रमती आपुलिया ॥ ५ ॥
बहिणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥ ६ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 20 |
संत बहिणाबाईचे अभंग
कोल्हापुरीं गाय होती जे सांगाते । कांहीं तें दुग्धातें देत होती ॥ १ ॥
गाय ते बांधोनी घातकी घरांत । सोटेही मारीत तयेलागीं ॥ २ ॥
पाहों गाय तंव न दिसे पाहतां । तुकोबासी व्यथा तेचि झाली ॥ ३ ॥
पाहातोसी काय होत असे कष्टी । तीन रात्री खुंटी बांधलीसे ॥ ४ ॥
नाहीं तृण पाणी मारिलेंसें फार । धांवण्यासी थोर नाहीं दिसे ॥ ५ ॥
तुकोबा जागृत झाले तंव पाठ । सुजेली ती नीट होयेची ना ॥ ६ ॥
सोटे अंगावरी दिसती तुकोबा । आठवी विठोबा नानापरी ॥ ७ ॥
देखोनी तयासी कष्ट होती जनां । सांगितलें स्वप्नांतील सर्व ॥ ८ ॥
तुकोबा अंतरीं आठवुनी देवा । धांव रे माधवा सोड म्हणे ॥ ९ ॥
कोणें गाय कोठें बांधिली कळेना । धांव नारायणा गाय रक्षीं ॥ १० ॥
तंव अकस्मात तयाचिये गृहीं । अग्नि लागे तोही महाथोर ॥ ११ ॥
धांवोनिया लोक विझविती अग्नि । गाय ते निमग्नीं बैसलीसे ॥ १२ ॥
जे गाय पहाती आजी तीन दिवस । चांडाळें तियेस बांधिलेंसें ॥ १३ ॥
गाय सोडोनिया आणिली बाहेरी । तंव पाठिवरी मारिलेंसे ॥ १४ ॥
भ्रतार आपुला बोलावुनी पाहे । गाय सांभाळीं हें ब्राह्मणा तूं ॥ १५ ॥
तुकोबा धांवोनी करी प्रदक्षिणा । नमस्कारी गुणा धन्य तुझे ॥ १६ ॥
दाखविलें स्वप्न मज गाय तुवां । न कळेचि धांवा केला माझा ॥ १७ ॥
तुझा माझा एका आत्मा सर्वांगत । ते साक्ष निश्चित आली मज ॥ १८ ॥
ऐसा तुकोबानें केला फार धांवा । तंव माझ्या जीवा दुःख झालें ॥ १९ ॥
मजही तैसेची क्लेश झाले फार । साक्ष हें अंतर विठ्ठलाचें ॥ २० ॥
तुकोबाचे पाठी पाहाताती जन । गायही देखोन थोर कष्टी ॥ २१ ॥
बहिणी म्हणे ऐसें वर्तलें हें जाण । गायीचें निर्वाण हरी जाणे ॥ २२ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 19 |
संत बहिणाबाईचे अभंग
आपाजी गोसावी पुण्यांत रहात । जो अति विख्यात राजयोगी ॥ १ ॥
तयाप्रती पत्र मंबाजी पाठवी । तुकोबा गोसावी शूद्रवाणी ॥ २ ॥
कथा करितसे देऊळीं सर्वदा । द्विज त्याच्या पदा लागताती ॥ ३ ॥
रामेश्वर भट अति योगी थोर । तेही नमस्कार त्यांसी करिती ॥ ४ ॥
आम्हांसी अन्याय हाची थोर वाटे । होत असें खोटें वेदवाक्य ॥ ५ ॥
तुम्ही थोर आहां दंड करावया । बांधोनीया तया न्यावें तेथें ॥ ६ ॥
आणीक ही एक स्त्री-पुरुष आहेती । तेही म्हणविती शिष्य त्याचे ॥ ७ ॥
म्हणविती ब्राह्मण आहेती सोनार । कुळकर्णी ही फार मान्य केले ॥ ८ ॥
स्वधर्माचा लोप होतसे देखोन । धाडिलें लिहोन म्हणोनिया ॥ ९ ॥
याचा कीं अपमान न करितां जाण । राज्यही बुडोन जाय तरी ॥ १० ॥
डोंबाळें मांडून स्वधर्म लोपला । पाहिजे रक्षिला स्वामीराजें ॥ ११ ॥
बहिणी म्हणे ऐसें पत्र पाठविलें । चोरोनी लिहिलें घरामाजीं ।
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 18 |
संत बहिणाबाईचे अभंग
मंबाजी गोसावी त्या स्थळीं नांदतां । गृह प्रवेशतां देखियेले ॥ १ ॥
जाऊनी तयासी मागितलें स्थळ । तो अति चंचळ क्रोध तया ॥ २ ॥
मारावया उठे घातलें बाहेरी । आनंदें वो वरी प्रार्थियेलें ॥ ३ ॥
तेथें राहोनिया भोजनासी गेलों । बहुत पावलों समाधान ॥ ४ ॥
वृत्तान्त पुसीला कोठोनि आलांत । चालतसा पंथ कवण कार्या ॥ ५ ॥
कांहींबाही तया सांगितलें पूर्व । म्हणे रहा सर्व पर्वणीसी ॥ ६ ॥
सोमवरीं आहे अमावस्या पुढें । रहा भक्तिकोडें सुख घ्यावें ॥ ७ ॥
नित्य हरिकथा होतसें देऊळीं । तुकोबा माऊली वैष्णवीची ॥ ८ ॥
रहा येथें तुम्हां भक्षावया धान्य । देऊं हेंही पुण्य आम्हां घडे ॥ ९ ॥
बहिणी म्हणे मग राहिलों देहूस । धरूनी हव्यास तुकोबाचा ॥ १० ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 17 |
संत बहिणाबाईचे अभंग
वत्साचिये माय कपिला सांगातें । धांवे एकचित्तें आम्हांपुढें ॥ १ ॥
मायबाप बंधु भ्रतारासहित । इंद्रायणी जेथ तेथें आलों ॥ २ ॥
करोनीया स्नान पांडुरंगभेटी । आनंदली सृष्टी अंतरंगें ॥ ३ ॥
तुकोबा आरती करीत होते तेथ । नमस्कारें स्वस्थ चित्त केलें ॥ ४ ॥
स्वप्नीं जो देखिला तेंच ध्यान तेथें । देखिलें नेमस्त पूर्ण दृष्टी ॥ ५ ॥
बहिणी म्हणे तेथ भ्रतारें साष्टांग । केला अंतरंग भावयुक्त ॥ ६ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 16 |
संत बहिणाबाईचे अभंग
आरोग्य तात्काळ व्यथेचा हारास । झाला दिसंदीस भ्रताराचा ॥ १ ॥
मग करी कृपा बोले समाधानें । द्वेषाचें हें ठाणें दूर केलें ॥ २ ॥
म्हणे आतां सर्व जावें येथुनियां । आपुलीया ठाया स्वस्थानां ॥ ३ ॥
देवें आपणासी ब्राह्मणाच्या वेषें । सांगितला शेष प्राक्तनाचा ॥ ४ ॥
तेंचि आतां करूं हरीची वो भक्ती । मिरासींची खंती वाटियेली ॥ ५ ॥
माझीं मायबापें तयांसी सांगत । तुम्ही जा निवांत देवगांवा ॥ ६ ॥
आपण अरण्यात दोघे करूं वास । देवाच्या बोलास धरोनीया ॥ ७ ॥
होवो आतां कल्याण किंवा अकल्याण । आम्ही तों संपूर्ण भक्ती करूं ॥ ८ ॥
तुकोबाचे गांवा जाऊनीया राहों । मनींच दृढावो धरोनीया ॥ ९ ॥
ऐसी पालटली भ्रताराची बुद्धि । स्वामी कृपानिधी अंतरसाक्ष ॥ १० ॥
काय एक देव करील तें नव्हे । प्रत्यक्ष अनुभवें सर्वजनां ॥ ११ ॥
बहिणी म्हणे अवघी चालिलों । तुकोबाच्या आलों दर्शनासी ॥ १२ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 15 |
वृद्धसा ब्राह्मण येऊनी बोलतु । म्हणे कां रे मृत्यु इच्छितोसी ॥ १ ॥
वैराग्य कां तुज आले असें मना । स्त्रीचा त्याग कोणा गुणें केला ॥ २ ॥
आधीं इचा विचारीं अपराध अंतरीं । मग कोपा करीं प्रवर्तावें ॥ ३ ॥
वांचण्याची इच्छा असलिया मानसीं । तरी तूं इयेसी अंगिकारीं ॥ ४ ॥
स्वधर्माविरहित वर्तेल ही जरी । तरी तिचा करीं त्याग वेड्या ॥ ५ ॥
ही आहे विरक्त निश्चिती हरिभक्त । तुवां पाहीं सत्य तैसें व्हावें ॥ ६ ॥
होईल कल्याण बोलत ब्राह्मण । भ्रतारें चरण वंदियेले ॥ ७ ॥
सांगितलें सर्व कारण आपण । देईं जीवदान आजी मज ॥ ८ ॥
ये व्यथेपासोनी वांचवीं स्वामीया । जीव तुझ्या पायां वाहीन मी ॥ ९ ॥
स्त्रियेसी सर्वथा न बोले आपण । हरीसी शरण जीवेंभावें ॥ १० ॥
केला नमस्कार प्रत्यक्ष उठोन । होईल कल्याण म्हणे द्विज ॥ ११ ॥
ऐकतें मीही दोघांचें बोलणें । घालीं लोटांगणें भ्रतारासी ॥ १२ ॥
झाला तो अदृश्य ब्राह्मण तात्काळ । आरोग्य कुशल देह झाला ॥ १३ ॥
बहिणी म्हणे देव कृपा करी तरी । सर्व सिद्धी द्वारीं तिष्ठतील ॥ १४ ॥
ऐकतें मीही दोघांचें बोलणें । घालीं लोटांगणें भ्रतारासी ॥ १२ ॥
झाला तो अदृश्य ब्राह्मण तात्काळ । आरोग्य कुशल देह झाला ॥ १३ ॥
बहिणी म्हणे देव कृपा करी तरी । सर्व सिद्धी द्वारीं तिष्ठतील ॥ १४ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 14 |
संत बहिणाबाईचे अभंग
भ्रतारें निश्चय केला मनामाजीं । जावें उद्या आजि टाकोनीया ॥ १ ॥
तंव त्यासी व्यथा जाली शरिरास । झाला सात दिवस ज्वाळ देहीं ॥ २ ॥
ओळखीचे जन नायके उत्तर । आपण अहोरात्र तयापासीं ॥ ३ ॥
दिधल्या औषध नेदी तया मान । जीव व्यथा फार पूर्ण सोसी ॥ ४ ॥
एक मासवरी अन्न विवर्जीत । व्यथा हे अद्भुत सोसीतसे ॥ ५ ॥
नाना देव कुळें देवतांची भाष । ठेविल्या विशेष बहु कांहीं ॥ ६ ॥
परी तया व्यथेलागीं न ये गुण । म्हणे तो मरण आलें मज ॥ ७ ॥
काय पांडुरंगा तुकोबासी निंदी । व्यथा तेचि संधि आली मज ॥ ८ ॥
जरी तुकाराम निंदिला त्यागुणें । असेल दुखणें व्यथा मज ॥ ९ ॥
तरी चमत्कार दाखवावा सध्यां । जीवीं विश्ववंद्या तुकारामा ॥ १० ॥
बहिणी म्हणे झाला अनुताप भ्रतारा । पांडुरंग पुरा अंतरसाक्ष ॥ ११ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 12 |
संत बहिणाबाईचे अभंग
भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी । जीव हा निर्धारीं देईन मी ॥ १ ॥
वत्सा साठीं देह अचेतन पडे । हें तंव रोकडें परब्रह्म ॥ २ ॥
भ्रताराचें तीर्थ न सांपडे जरी । अन्न खाय तरी मांस आम्हां ॥ ३ ॥
भ्रताराचें शेष न सांपडे तरी । पापें माझ्या शिरीं त्रैलोक्याचीं ॥ ४ ॥
चित्त हें भ्रताराविण जरी जाये । तरी वास होय नरकीं आम्हां ॥ ५ ॥
भ्रतारदर्शनाविण जाय दीस । तरी तेचि रास पातकांची ॥ ६ ॥
बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण । ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥ ७ ॥
![]() |
Sant Bahinabaiche Abhang 11 |
संत बहिणाबाईचे अभंग
मजवरी दृष्टी कृपेची ओतिली । प्रेमाची गुंतली माय जैसी ॥ १ ॥
अंतरींची पूजा घेऊनी जयराम । गेला तो सप्रेम स्वस्थाना ॥ २ ॥
उगाची बैसला आसनीं समस्त । करोनियां स्वस्थ चित्तवृत्ति ॥ ३ ॥
तव कांहीं एक अपूर्व वर्तलें । तुकारामें दिलें दर्शनासी ॥ ४ ॥
केला नमस्कार भेटुनी आनंदें । अत्यंत आल्हादें स्वामी सखा ॥ ५ ॥
मजही दर्शन दिधलें अळुमाळ । घातला कवळ मुखामाजीं ॥ ६ ॥
मज म्हणे आलों जयराम भेटीसी । तुजही मानसीं ओळखिलें ॥ ७ ॥
तुम्ही आतां येथें नको राहों कदा । आत्मज्ञानबोधा न संडी वो ॥ ८ ॥
बहिणी म्हणे दर्शन दुसरें । मनाच्या व्यापारें तुकोबाचें ॥ ९ ॥
Subscribe to:
Posts (Atom)