शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणार्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा सर्वाना कळावा या उद्देशाने सम्पूर्ण ज्ञानेश्वरी येथे लिहित आहोत याचा सर्वानी लाभ घ्यावा.