जन्माला आल्यापासून ते अगदी देहावसन होईपर्यंत आपल्याला निरनिराळ्या व्यक्तींच मार्गदर्शन कायम लागत असतं.
आई काय शिकवते म्हणून काय सांगू बोबडे बोल स्पष्ट बोलण्यापासून बरेच काही आईच शिकवते. ( आई माझा गुरू... आई माझा कल्पतरू... सुखाचा सागरू.. आई माझी..! ) याहून वेगळे काय सांगू.
तसेच आयुष्याच्या या खडतर प्रवास कसा पार करावा हे वडील शिकवतात.
तर आयुष्य सुखकर कसं कराव आणि जगावं हे सद्गुरू सांगतात.
जीवन जगत असताना आपल्या कळत न कळत मार्गदर्शन करणारे गुरु आपल्या भेटत असतात या सर्वांच्या समोर आज नतमस्तक होण्याचा आजचा दिवस
‘गुरूपौर्णिमा’.