पसायदान
आता विश्वातत्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचें ॥
दुरीतांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जे वांछीलं तो ते लाहों । प्राणिजात ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ॥
चलां कल्पतरुंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषांचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहूना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिन्ही लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इयें ।
दृष्टादृष्टविजये । होआवे जी ॥
येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसाओ
येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥