संत चोखामेळा -
देखिला देखिला योगियांचा ...
पंढरीमहिमा
देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवी नाहो पंढरीचा ॥१॥
पुंडलिकासाठीं युगें अठ्ठावीस । धरुनी बाळवेष भीमातटीं ॥२॥v
गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळ । नाचती गोपाळ विठ्ठलछंदें ॥३॥
चोखामेळा तेथें वंदितो चरण । घाली लोटांगण महाद्वारीं ॥४॥