संत चोखामेळा -
नेणते तयासी नेणता लाहान ।...
पंढरीमहिमा
नेणते तयासी नेणता लाहान । थोर थोरपणें दिसे बरा ॥१॥
पोवा आहे वेणु खांदिया कांबळा । रुळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचे । उष्टें गोपाळांचें खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठाचा हरी । गोपाळा गजरीं काला वाटी ॥४॥