" अंबिका माता प्रसन्न "
सर्व तोंडोली ग्रामस्त ,सभासद
व अंबिका भक्तांस सप्रेम नमस्कार
तोंडोली गावातील ग्रामस्त
नोकरी धंद्याकरिता मुंबई-ठाणे-पुणे येथे आले आहेत,त्यापैकी काही जन एकत्र येऊन
श्री अंबिका मंदिर सभा मंडप जीर्णोध्दार करण्याचा ध्येयाने प्रेरित होऊन जय अंबिका
सेवा मंडळ ट्रस्टची स्थापनासात सन २००१ साली तोंडोली ग्रामस्थाचा बैठकीचा गळा क्र.१०/३१ शिवडी बी.डी.डी चाळ या
पत्यावर झाली .सुरुवातीला रु.२५/- वर्गणी जमवून मंडळाचे सभासद करण्यात आले त्यानंतर
रु.१००/- व रु.५००/- अजिव सभासद वर्गणी जमविण्यात आली तय्दार्म्यान सभासदाच्या माध्यमातून
सन २००८ ते २००९ पर्यंत रु.७०००००/- (रु.सात लाख ) जमा झाले.
जय अंबिका सेवा मंडळ
ट्रस्टने तयार केलेली सभामंडप जीर्णोध्दाराची योजना ही अंदाजे दीड कोटी रुपयाची
होती.वस्तूस्थिती पाहता कोट्यावधी रुपयाची जीर्णोध्दाराची योजना पूर्ण करणे हे अशक्य
असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना होऊ लागली आहे.तरी हनुमंताच्या वानरसेने प्रमाणे
प्रत्येक सभासद जिद्दीने आपापल्या ताकदी प्रमाणे खारीच्या वाटयासारखे आर्थिक
सहकार्ये करत होते.
त्या दरम्यान इमारतीचा
नकाशा तयार करणे,आर्किटेक नेमणे,टेंडर नोटीस काढणे,वर्क ओर्डर देणे इत्यादी
महत्वाची कामे सुरु केली.ट्रस्टची सेक्रेटरीनी पहिले पाऊल टाकण्याचे ठरविले
ट्रस्टच्या पूर्व इतिहास पाहता ट्रस्टच्या स्थापणेपासून आठ ते नऊ वर्ष्यात रु.सात
लाख जमा झाले.त्यामुळे पदाधिकारी कोणत्याही प्रकारे धोका पत्करण्यास तयार होत नव्हते.सदर
बाब योग्याच होती.काम सुरु केले आणि निधी जमला नाही तर हा प्रश्न सर्वापुढे
ब्राम्हराक्षासा सारखा समोर उभा राहिला होता अशा नाजूक परीस्थीतीत ट्रस्टच्या सेक्रेटरिनी
जीर्णोध्दाराचे काम सुरु करण्याचा प्रस्ताव ट्रस्टच्या सभासदाच्या समोर ठेवला
परंतु कोणतीही धोका पत्करण्यास सभासद तयार नवते तरीसुद्धा पहिले पाऊल टाकल्याशिवाय
यश किवा अपयशाची परीक्ष्या देता येणार नाही असे मत सेक्रेटरीचे होते शेवटी
सर्वानुमते अपयशाची तमा न बाळगता उपलब्ध
निधी मध्ये जीर्णोध्दाराचे काम सुरु
करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व प्रथम अंबिका भक्तांची
गैरसोय होऊ नये म्हणून भक्त निवास शेडचे काम सुरु करण्यात आले त्या नंतर मुळ
सभामंडप जीर्णोध्दाराचे काम सुरु करण्यात आले पहिले पाऊल उचलल्यामुळे यशाच्या
वाटचाल सुरु झाल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला.श्री
अंबिका मते चा आशीर्वाद व सर्व ग्रामस्थांची एकी व ट्रस्टच्या कार्याकार्तायंची
मेह्नेत या सर्व बाबींच्या आधारे ती दुसरे पाऊल टाकण्याचा निर्णय ट्रस्टतर्फे
घेण्यात आले जीर्णोध्दाराचे काम जसजसे होत गेले तसतसा निधी जमा होत गेला त्याला
खरी साथ मिळाली ती ट्रस्टच्या सभासदांची व दानशूर देण्गीधारांची व हितचिंतकांची या
सर्वांमुळे सभामंडप जीर्णोध्दाराचे खडतर प्रवास पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आले आहे
आजमिती ९०टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
मागे वळून बघितले असता ह्या
प्रवासात कडू गोड अनुभव आले.कार्यकर्त्यांची दमछाक होत होती.अनेक मतभेद निर्माण
होत होते.आरोप प्रत्यारोप होत होते निधीची कमतरता भासत होती.वर्ष्या मागून वर्षे
सरकत होती.बघता बघता १६ वर्षे कशी निघून गेली ते कळलेच नाही.कार्यकर्ते किती थकले
तरी सभासमंडपाची उभी राहहिलेल्या मंदिर सभामंपाकडे बघितले कि पुन्हा नवचैतन्य येत
होते पुन्हा आवश्यक निधी जमा होत होता त्या जमलेल्या निधीतून राहिलेले काम पूर्ण
होत होते या सर्व प्रवासाने सभामंडपाचे ९०
टक्के काम पूर्ण झाले.हे याशाच्या वाटचालीचे धोतक आहे. १० टक्के काम पूर्ण झाले
कि,आपण यशस्वी होऊ अशा आत्मविश्वास निर्माण झाला.
शिल्लक राहिलेल्या
कामामध्ये तळघरातील प्लास्टर व लादिकाम पहिल्या माळ्यावर प्लास्टर व लादी काम सभामंडपाच्या
जिण्याचे प्लास्टर ,इमारतीच्या बाहेरील प्लास्टर ,शोभेच्या देव देवतांच्या
मूर्ती,साधू संतांच्या मूर्ती ,वायरिंगचे काम ,संपूर्ण रंगकाम इमारतीच्या सभोवताली
वृक्षरोपण व गार्डनचे काम इत्यादी महत्वाची कामे करावयाची आहेत. त्या नंतर २१ कळस
पितळेचे वाघ-सिंह, कासव मोठी घंटा इत्यादी कामे शिल्लक आहेत.याचा अंदाजे खर्च
रु.७००००००/- एवढा अंदाजे अपेक्षित खर्च आहे.
पुन्हा एकदा अंबिका देवीच्या
आशीर्वादाने शेवटचे यशस्वी पाऊल टाकण्याची वेळ आली आहे.सर्व ग्रामस्थांनी एकत्र
येऊन जय अंबिका सेवा मंडळाच्या माध्यमातून
यश संपादन करायचे आहेत.त्याकरिता सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून शक्य तेवढे आर्थिक
सहकार्ये करून कार्यकर्त्यांना भक्कम आधार देऊन पुन्हाएकदा जिद्दीने पर्यंत करून
तोंडोली नगरी मध्ये इतिहास निर्माण करायचा आहे.सर्वांनी या सुवर्ण इतिहासाचे
मानकरी व्हायचे आहे.
ही कलीयुगामध्ये तोंडोली
मध्ये ८१ फुट उंचीचे व दहा हजार फुट क्षेत्रफळ असलेले मंदिर निर्माण होने ही पुरण
काळात निश्चित्त झालेले देवदेवतांनी निश्चित केलेले देवकार्य आहे.ज्या अंबिका
भक्तांनी या कामात सहकार्य केले आहे हे भक्त भाग्यवान आहेत.अजूनही ज्या ग्रामस्तानी
या कार्यास सहकार्य केले नाही.त्यांना पुन्हा एकदा विनंती करत आहोत आपण ह्या देवकार्यास
सहकार्य करण्याची संधी सोडू नये जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करावे .
त्याच बरोबर आजपर्यंत आलेल्या
देणगीदारांच्या याद्या फायनल करण्याचे काम लवकर सुरु करण्यात येणार आहे.तरी
ज्यांना आपण दिलेल्या देणगीत वाढ अथवा
नावात बदल करवयाचे असेल त्यांनी ट्रस्टच्या पाधाधीकार्यांशी संपर्क साधून आवश्यक
तो बदल करून घ्यावा हि विनंती. रु.५०००/- वरील देणगी दिलेल्या देणगीदारांची नावे
लादीवर ,कोरण्याचे काम सुरु केले जाईल.यावर्षी यात्रे निम्मित जास्तीत जास्त रोख
देणगी देऊन सहकार्य करावे जेणेकरून सभामंडप जीर्णोध्दाराचे शेवटचा यशस्वी टप्पा
पूर्णत्वास जाईल यात्रेनिम्मित येणाऱ्या देणगीदारांनी अंबिका भक्तांनी माहेरवाशिणी
व पाहुण्र यांनी आपले मोबाईल नंबर,गावाचे नाव व स्वतःचे पूर्ण नावाची मंदिरात
ठेवलेल्या नोंद वहीत नोंद करावी.जेणेकरून कलशरोहण कार्यक्रमाचे निम्रंत्रण देणे आम्हाला सोपे होईल व आवश्यक
पाहुणचार करता येईल.
‘अंबिका देवीच्या नावाने चांग भल’
आपले नम्र ,
जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट
तोंडोली