मंगळागौरीची आरती
जयदेवी मंगळागौरी ।
ओंवाळीतें सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ।
हीरेया मोती ज्योति ॥धृ॥
मंगलमूर्ती उपजली कार्या ।
प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।
तिष्ठली राजबाळी ।
अहेवपण द्यावया ॥१॥
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या ।
सोळा तिकटी सोळा दुर्वा ।
सोळा परींची पञी ।
जाईजुई आबुल्या ।
शेवंती नागचाफे ।
पारिजातकें मनोहरें ।
गोकर्ण महाफुलें ।
नंदटें तगरें ।
पूजेला ग आणिली ॥२॥
साळीचे तांदुळ मुगाची डाळ ।
आळणी खिचडी रांधिती नारी ।
आपुल्या पतीलागीं ।
सेवा करिती फार ॥३॥
डुमडुमें डुमडुमें वाजंञी वाजती ।
कळावीं कांकणे गौरीला शोभती ।
शोभती बाजुबंद ।
कानी कापांचे गबे ।
ल्यायली अंबा पूजूं बैसली ॥४॥
न्हाऊनी माखुनी मौनी बैसली ।
पाटवाची चोळी क्षीरोदक नेसली ।
स्वच्छ बहुत होऊनी ।
अंबा पूजूं बैसली ॥५॥
सोनियाचे ताटीं घातिल्या पंचारती ।
मध्यें उजळती कर्पुरीच्या वाती ।
करा धूप दीप ।
आतां नैवेद्य षड्रस पक्वानें ।
ताटीं भरा बोनें ॥६॥
लवलाहें तिघें काशीसी निघालीं ।
माउली मंगळागौर भिजवूं विसरली ।
मागुती परतुनियां आली ।
अंबा स्वयंभू देखिली ।
देउळ सोनियाचें ।
खांब हिरयांचे ।
कळस मोतियांचा ॥७॥