Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com

Shankarachi Aarti

शंकराची आरती 

 
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा |
विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ||
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा |
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा || १ ||

जयदेव जयदेव जय श्री शंकरा |
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा || धृ ||

कर्पुगौर भोळा नयनीं विशाळा |
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ||
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा |
ऎसा शंकर शोभे उअमवेल्हाळा || २ ||

देवीं दैत्यीं सागर मंथन पैं केले |
त्यामाजी अवचित हलहल जे उठिले ||
तें त्वां असुरपणें प्राशन केलें |
नीलकंठ नाम प्रसिध्द झालें || ३ ||

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी |
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ||
शतकोटींचे बीज वाचे उच्चारी |
रघुकुळटिळक रामदासाअंतरी || ४ ||
Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X