Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com

Vithalachi Aarti

विठ्ठलाची आरती



युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ जय देव जय देव ॥धृ॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥२॥

धन्य वेणुनाद अनुक्षेञपाळा ।
सुवर्णांची कमळें वनमाळा गळां ॥
राही रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥

ओंवाळूं आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमांजी स्नानें जे करिती ।
दर्शनहेळामाञें तयां होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावें ओंवाळिती ॥५॥
Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X